Monday, March 18, 2013

पथरा घाट


खुप दिवसांपासुन काही तरी हटके ट्रेक करायचा असा विचार सगळ्याच मित्रमंडळीमधे चालू होता. तेव्हाच ताईने कुमशेत जवळ एक नवीन पथरा नावाचा घाटरस्ता शोधून काढला. मला तरी आधी ह्या घटाबद्दल काहीच माहिती नव्हती. आजोबा गडाच्या मागच्या बाजूने हा घाट खाली तळेगावच्या दिशेने जातो असे समजले. आम्ही आठजण शनिवारी रात्री कसार्याला भेटलो आणि आमचा कुमशेतच्या दिशेने खाजगी गाडीतून प्रवास सुरू झला. कुमशेत ला पोचायला पहाटेचे .३० वाजले. आता सूर्योदय झला की निघू असा ठरवल आणि थोड्यावेळा साठी झोपलो. रात्रभरच्या प्रवसाने गाड झोप लागली

कुमशेत जवळील ठकूरवाडीतील पाण्याचे डोह.

zeenat,vishal,pavan.
सकाळी वाटाड्या ठरवला आणि ट्रेक साठी निघालो. घाटाच्या तोंडापर्यंत जायला उशिराच झला. डोक्यावर सूर्य तळपत होता. जेंव्हा दरीच्या टोकावरून पूर्ण मार्ग बघितला तेंव्हा सगळ्यांची बोबडीच वळली!!!   शेवटी काही झला तरी हा घाट संपूर्ण आणि सुखरूप उतरायचा अस ठरवल. बाजूला दिसणारा हरिश्चंद्रगड आमचा आत्मविश्वास वाढवत सुखरूप जा असा खुणावत होता.
घाटाचा मार्ग बघताना.डावीकडून yadnesh,pava,sagar,asavale mama,zeenat,priti ,rajas,vishal.
घाटाच्या सुरुवातीलाच खूप घसार होता. पाय ठेवायला थोडिशीच जागा होती. एकबाजुला भिंत आणि एका बाजूला खोल दरी. असा रस्ता म्हणजे पर्वतारोही साठी जणू काही स्वर्गाचाच रस्ता.
रॉक पॅच वर आदित्य.
  दोन तीन रॉक पॅच झल्यावर एका घळीत थांबलो. आतातर सूर्यदेव जास्तच ताळपू लागले होते. पुढचा रस्ता साधा असेल असा वाटल पण कसला काय! पुढे तर अजुन जास्त घसर्डी माती आणि  तापलेले खडक होते. कठीण पॅचस झल्यावर ठकूरवा डीतल्या दादंना निरोप दिला आणि पुढचा रस्ता समजून घेतला.
पथरा घाट.

स्क्री पॅच वर रजस प्रीती सागर विशाल yadnesh. 
ह्या रस्त्यावर खरा कस लागला. जवळ जवळ एक तास उतरल्यावर ओढ्या पाशी  पोचलो. ओढ्यात थोडेफार पाणी होते. मग इथेच दुपारचे जेवण आटापले आणि  कुंडेचिवाडी कडे निघालो. खाली उतरल्यावर रतनगड दिसू लागला होता.
आजोबागड.
अर्ध्या पाउण तासातच वाडीत पोचलो अन् पथरा घाट पूर्ण केला. आता दूरवर अलंग मदन कुलंगची रांग पण दिसत होती. डावीकडे नाणेघाट जीवधन धूसारशे दिसत होते. तो क्षण खरच अविस्मरणीय होता... 

Thursday, October 4, 2012

Wow on 2nd October  2012 i just visit kas plateau at satara. the most beautiful flowers seen.wonderful trail i had last day.
there are some photos of flowers i clicked hope you like it.






























thank you very much.